आज (दि.२१)पासून दोन दिवस ग्रंथोत्सव; भरगच्च कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर, हा प्रतिनिधी- उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने शुक्रवार दि.२१ व शनिवार दि.२२ असे दोन दिवस ग्रंथोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे, ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच विविध उपक्रम हे दोन दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत समता दर्शन वाचनालय सभागृह चुन्नीलाल पेट्रोल पंप समोर समता नगर सर्वांसाठी खुले असणार आहे. या कार्यक्रमास सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेत विधान परिषद अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खा. डॉ.भागवत कराड, खा.संदीपान भूमरे, खा.डॉ.कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ.सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, विधान सभा सदस्य आ.अब्दुल सत्तार, आ.प्रशांत बंब, आ.प्रदीप जैस्वाल, आ.रमेश बोरनारे, आ.श्रीमती अनुराधा चव्हाण, आ.श्रीमती संजना जाधव, आ.विलास भूमरे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, शिक्षणाधिकारी (माध्य) श्रीमती अश्विनी लाटकर, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, दै.लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख, साहित्यिक प्रशांत गौतम उपस्थित राहणार आहे.
ग्रंथोत्सवाचा प्रारंभ शुक्रवार दि.२१ रोजी सकाळी ९ वा. क्रांती चौकातून ग्रंथदिंडीद्वारे होणार आहे. ग्रंथदिंडीस प्रमुख उपस्थिती मानव विकास आयुक्तालय उपायुक्त मिलिंद नारिंगे, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक डी.एस.काटे, कुंडलिक अतकरे यांची राहणार आहे. सकाळी साडेदहा वा. उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ.दासु वैद्य असणार आहे.दुपारी २ वा. ‘मराठी भाषेच्या विकासात ग्रंथालयाचे योगदान’ या परिसंवाद कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने अध्यक्षस्थानी असणार आहे. परिसंवाद कार्यक्रमात डॉ.रा.श बालेकर, अनिल लहाने, गुलाबराव मगर सहभाग घेणार आहे. सायं.४ वा. काव्य वाचन कार्यक्रमात अध्यक्ष श्रीमती आशा डांगे ह्या असून पंजाबराव मोरे, सुनिल उबाळे, सुनीता कपाळे, श्रीमती प्रतिभा धामणे, गिरीश जोशी, श्रीमती दिव्यलता गुजराथी, संदीप भदाणे, मारोती गायकवाड, रामप्रसाद वाव्हाळ यांचा सहभाग राहणार आहे.
शनिवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ११ वा. ‘भारतीय संविधान – हक्क आणि कर्तव्य’ या विषयावरील परिसंवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ.जयदेव डोळे असणार आहे. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ.ह.नि. सोनकांबळे, ॲङ बाबा सरदार उपस्थित राहणार आहे. दुपारी २ वा. कथाकथन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी उत्तम बावस्कर सहभाग गेनू शिंदे, सरदार जाधव, श्रीमती ज्योती सोनवणे असणार आहे. दुपारी ४ वा. समारोप समारंभास प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ संपादक प्रविण बर्दापुरकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, हास्य कवी डॉ. विष्णू सुरासे, जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष सुभाष सोळंके उपस्थित राहणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमास ग्रंथप्रेमी, वाचकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव – २०२४ समन्वय समितीचे अध्यक्ष सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, सदस्य शिक्षणधिकारी (माध्य) श्रीमती अश्विनी लाटकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, कार्यवाह मराठवाडा साहित्य परिषद डॉ.दादा गोरे, प्रकाशक संघटना कुंडलिक अतकरे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष सुभाष सोळंके, सदस्य सचिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष धो. साबळे, संयोजन सदस्य ज्ञानेश्वर पैठणे, दीपक काळे, संजीव ठाकूर, श्रीमती उज्वला नाटकर आदींनी केले आहे.