vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा समाज आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगें पाटील जीआर रद्द करण्याच्या मागणी मुद्द्यावर काय म्हणाले ते पहा

 मराठा समाज आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगें पाटील जीआर रद्द करण्याच्या मागणी मुद्द्यावर काय म्हणाले ते पहा

राज्य प्रतिनिधी-

मराठा समाज आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगें पाटील जीआर रद्द करण्याच्या मागणी मुद्द्यावर काय म्हणाले ते पहा…

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा २ सप्टेंबर रोजीचा जी. आर. चॅलेंज करण्याचे त्यांनी ठरवले आहे, तर आम्हीदेखील सन १९९४चा जी. आर. रद्द करण्याची मागणी करू, तेव्हा पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्या आहेत, त्यादेखील बाहेर काढा, अशी मागणी करू, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, १९९४ मधील या जीआरनुसार धनगर आणि वंजारी जातींना उपवर्ग करून आरक्षण देण्यात आले होते. जरांगे यांनी वंजारी समाजाला दिलेले दोन टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. ‘बोगस जाती’ आणि ‘प्रगत जाती’ यांनाही आरक्षणातून बाहेर काढण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले

0000

संबंधित पोस्ट

साहित्य अकादमीचा साहित्योत्सव होणार दिमाखदार;7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. 

vishwatmaklokswamivarta

कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविणार – वनमंत्री गणेश नाईक

अनुसूचित जाती व जमातीतील मृतांच्या १०८ वारसांना लवकरच शासकीय नोकरीचा आदेश ; प्रक्रिया अंतिम टप्प्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विभागीय दक्षता समितीच्या बैठकीत माहिती

राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गुळ, खाद्यतेल, तूप,  इ. अन्न पदार्थ तसेच भेसळ म्हणून वापरण्यात येणारे अन्न पदार्थाच्या सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किंमतीचा ८४ हजार ३३५ किलो इतका साठा जप्त

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले

vishwatmaklokswamivarta