vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत अयोध्या दर्शनाचे नियोजन-जेष्ठ नागरिकांनी सक्षम वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत अयोध्या दर्शनाचे नियोजन-जेष्ठ नागरिकांनी सक्षम वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 

        बुलडाणा, प्रतिनिधी : मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना श्रीराम मंदिर अयोध्या(उत्तरप्रदेश) या तिर्थस्थळी ने-आण करण्यासाठी दि. 7 ते 11 मार्च 2025 या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे. या तिर्थस्थळ दर्शनाकरीता पात्र असलेल्या जेष्ठ नागरिकांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.

  श्रीराम मंदिर अयोध्या तिर्थस्थळी जाणाऱ्या पात्रताधारक जेष्ठ नागरिकांनी सामान्य रुग्णालय तसेच तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणाकडून वैद्यकीय तपासणी करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र समाजकल्याण कार्यालयाकडे सादर करावे. तसेच प्रवासाकरीता जाण्याची तारीख व वेळ लाभार्थ्यांना यथावकाश दुरध्वनीव्दारे कळविण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

0000000

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई ; ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

vishwatmaklokswamivarta

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

घनसावंगी विधानसभेतून गोविंद ढेंबरे यांना विधान परिषदेसाठी संधी द्यावी – भाजप कार्यकर्त्यांचा एकमुखी ठराव,पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या कार्याचा गौरव • स्थानिक नेतृत्वाला न्याय देण्याची मागणी

परभणीसाठी उदयोन्मुख जिल्हा दर्जा, झोन-१ व डी+ श्रेणी मंजूर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रयत्नांना यश

vishwatmaklokswamivarta

टी. सी. महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ