vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

राज्य प्रतिनिधी-जालना | केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहिता (Four Labour Codes) या पूर्णतः कामगारविरोधी, भांडवलधार्जिण्या व संविधानाच्या समान, सन्मान आणि न्याय तत्वांच विरोध करणाऱ्या कायद्यांविरोधात All India Central Council of Trade Unions (AICCTU) यांनी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी संप व आंदोलनाची हाक दिली आहे.

या देशव्यापी हाकेला पाठिंबा व एकजूट दर्शविण्यासाठी, मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निवेदन सादर करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या सविस्तर नियोजनासाठी रविवारी दि. ०८/०२/२०२६ रोजी मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या कार्यालयात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.

ही बैठक कॉम्रेड सोहम प्रकाश बोदवडे, सहसचिव, मराठवाडा सर्व श्रमिक संघटना यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीत चार श्रम संहितांमुळे संघटन स्वातंत्र्य, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, नोकरीची सुरक्षितता व संघर्षाचे अधिकार कसे हिरावले जात आहेत, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या संहिता कामगारांना गुलामगिरीकडे ढकलणाऱ्या आणि कॉर्पोरेट-भांडवलदारांच्या हितासाठी तयार केलेल्या असल्याचे बैठकीत ठामपणे मांडण्यात आले.

या आंदोलनाचे स्वरूप पूर्णतः शांततामय व लोकशाही मार्गाने असणार असून, कामगार, कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील श्रमिक, शेतमजूर, महिला, युवक, प्रगतिशील संघटना व लोकशाहीवादी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. या अनुषंगाने दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे धरणे आंदोलन करून निवेदन सादर करण्यात येणार आहे.

नियोजन बैठकीस संघटना पदाधिकारी कॉ. शंकर लोखंडे तालुकाध्यक्ष जाफराबाद, कॉ. गुलाबराव जाधव सचिव घनसावंगी, कॉ. ज्ञानदेव घोडे तालुकाध्यक्ष मंठा, कॉ. जिजा घायतडक तालुका युवा अध्यक्ष घनसावंगी, कॉ. बेबी चव्हाण महिला आघाडी, कॉ. शोभा लिहिणार, कॉ. उमा सराटे, कॉ. सुंदरा साठे, कॉ. छबु सराटे, कॉ. शेषराव भालेराव, कॉ. दिलीप पांडव, कॉ. वामन आठवले, कॉ. बन्सी जाधव, कॉ. भीमराव राठोड, कॉ. प्रल्हाद जाधव तसेच इतर अनेक कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीचा समारोप AICCTU च्या देशव्यापी संपाची हाक यशस्वी करण्याचा, चार श्रम संहितांना निर्णायक प्रतिकार उभारण्याचा आणि कामगार-लोकशाही हक्कांच्या रक्षणासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार करून करण्यात आला.

000000

संबंधित पोस्ट

शहीद जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते नूतनीकृत ‘अंधेरी आर.एस. टपाल कार्यालया’चे लोकार्पण 

बीआयएस’च्यावतीने मुंबईत जागतिक मानक दिनानिमित्त ‘मानक महोत्सव’ साजरा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देशभरातील 83 शहरांमधील 2,072 केंद्रांवर नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 चे आयोजन

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta