vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

इस्रायल अमेरिका इराण संघर्ष- भारताकडे येणारं दोन जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, इराणच्या रेवोल्युशन गार्ड यांची कारवाई…

 इस्रायल अमेरिका इराण संघर्ष- भारताकडे येणारं दोन जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, इराणच्या रेवोल्युशन गार्ड यांची कारवाई…

राज्य प्रतिनिधी-

इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणारी दोन जहाजं जप्त केली आहेत. ही जहाजं जप्त करुन इराणकडे नेली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन पैकी एक जहाज भारताकडे येणार होतं. भारताकडे येणारं जहाज दुबईतून निघालं होतं, ज्यावर लिबेरियाचा ध्वज लावलेला होता.

एएफपीच्या रिपोर्टनुसार आयआरजीसीच्या नौदलानं सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नियमांचा भंग करणाऱ्या दोन जहाजांना ताब्यत घेतलं आहे. आयआरजीसीनं दोन जहाजं जप्त केली असून ती इराणकडे नेली जात आहेत.

सागरी वाहतुकीच्या क्षेत्रातील वेबसाईटनुसार इराणच्या ताब्यात असलेल्या जहाजांची नावं MSC-FRANCESCA आणि EPAMINONDAS अशी आहेत. जहाज ट्रॅकिंग  डेटानुसार, इराणकडून जप्त करण्यात आलेलं जहाज एपामिनोंडास हे गुजरातच्या मुंद्रा पोर्टकडे निघालं होतं. जहाज दुबईतून निघालं होतं आणि ते गुजरातमध्ये पोहोचणार होतं. मात्र, आयआरजीसीनं जहाजावर हल्ला करत ते ताब्यात घेतलं आहे.  भारताकडे जाणाऱ्या जहाजाच्या जप्तीमुळं सप्लाय चेन संदर्भातील भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.

इराणच्या आयआरजीसीनं पश्चिम आशियातील अमेरिकन तेल कंपन्या आणि तेलविहिरींवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं ही धमकी देण्यात आली आहे.  इराणकडून धमकी देण्यात आली की अमेरिकेकडून त्यांच्यापायाभूत सुविधांवर हल्ले करण्यात आल्यास पश्चिम आशियातील अमेरिकेच्या जितक्या तेल विहिरी आहेत त्या उद्धवस्त केल्या जातील. इराणनं स्पष्ट केलं की अमेरिकेची मालकी असलेल्या तेल कंपन्यांवर हल्ले केले जाऊ शकतात.

इराणने यापूर्वी इराणच्या सागरी हद्दीत तीन जहाजांवर जोरदार गोळीबार केला होता. तीन मालवहातूक जहाजांवर गोळीबार करण्यात आला होता. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी असलेल्या जहाजावर आयआरजीसीच्या गनबोटमधून अचानक गोळीबार सुरु झाला होता.

अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसऱ्या टप्प्यातील चर्चा पाकिस्तानमध्ये होणार होती, ती अद्याप होऊ शकलेली नाही. ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी दोन आठवडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं पश्चिम आशियात तणाव वाढलेला आहे

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कधी संपणार?अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडून 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर इराणनं देखील विविध देशांवर हल्ले केले होते. अमेरिका आणि इस्त्रायल विरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर लवकर संपेल असं वाटलं होतं. मात्र, अमेरिका आणि इस्त्रायलला इराणनं नेते गमावून देखील उत्तरं दिलं आहे. आता अमेरिका आणि इराण संघर्ष कधी थांबणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. अशी ही बातमी सोच इंडिया डॉट कॉम वर देण्यात आलेली आहे

संबंधित पोस्ट

लडाखमध्ये भूकंपाचा धक्का! लेह परिसरात रिश्टर स्केलवर ५.५ तीव्रतेची नोंद..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जिल्हा नियंत्रण कक्षास भेट-आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता तात्काळ उपाययोजना राबवा- उपमुख्यमंत्रीआपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा- उपमुख्यमंत्री

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप  विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..

आसाम मध्ये प्रचाराचा धुमधडाका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची काँग्रेसवर जोरदार टीका-विकसित आणि घुसखोरमुक्त आसामसाठी भाजपाला प्रचंड बहुमतानं विजयी केल्याचं आवाहन त्यांनी केले 

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट,भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.