
मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक..
मुंबई, प्रतिनिधी-मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांच्या कामांच्या भूसंपादनासाठी लागणारे कर्ज हुडकोकडून घेण्यास तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी टप्पा २ मधील १०६३ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली.



