vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह,माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे यांना निवेदन

भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह,माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे यांना निवेदन

 

जालना (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीत संघटन बांधणीत आयुष्य घालवलेल्या आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी मजबूत नाळ असलेल्या भास्कर आबा दानवे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी भाजपा जालना महानगरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर व जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, भास्कर आबा दानवे यांनी गेली अनेक वर्षे जालना विधानसभा मतदारसंघात पूर्णवेळ पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले आहे. बूथ स्तरापासून शहर व ग्रामीण भागापर्यंत भाजपा विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. पक्षाच्या अडचणीच्या काळातही कार्यकर्त्यांना बळ देत संघटना टिकवून ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. भास्कर आबा दानवे यांनी जालना नगरपरिषद उपनगराध्यक्ष, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, विधानसभा प्रमुख तसेच सध्या महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. पक्ष संघटनेत दीर्घकाळ सक्रिय राहून त्यांनी हजारो कार्यकर्त्यांशी थेट संपर्क निर्माण केला असून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात त्यांची मजबूत पकड असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. पक्षासाठी निष्ठेने आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची भाजपाची परंपरा आहे. त्यामुळे भास्कर आबा दानवे यांच्यासारख्या संघटन मजबूत करणाऱ्या नेतृत्वाला विधानपरिषदेची उमेदवारी देऊन न्याय मिळावा,” अशी भावना यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, गटनेते महेश निकम, जिल्हा सरचिटणीस वसंत शिंदे, अमोल कारंजेकर, सुनील पवार, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, अमोल धानुरे, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, मनोज बिडकर, गोवर्धन कोल्हे, देविदास देशमुख, राजेश जोशी, भाजपा जालना विधानसभेतील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रविकासात अभियंत्यांचा सहभाग वाढवा वन नेशन वन अभियांत्रिकी सेवा नियम लागू करावा-इंडेफची मागणी. ३ एप्रिलला नवी दिल्ली येथे बैठक इंजि. के. एम. आय. सय्यद सरचिटणीस, इंडेफ यांनी दिली माहिती.

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राने पंढरीची वारी पदयात्रेच्या माध्यमातून शारिरीक तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक सलोख्याचा केला प्रसार घोषणा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळीला दिले प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (#एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ

महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना…

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.