vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महिंद्रा अँड महिंद्रा येथे इंटर्नशिप कॅम्प; ५१० जागांसाठी २० मे रोजी मुलाखती

महिंद्रा अँड महिंद्रा येथे इंटर्नशिप कॅम्प; ५१० जागांसाठी २० मे रोजी मुलाखती

व्यवसाय प्रतिनिधी-पुणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी Mahindra & Mahindra येथे इंटर्नशिपची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून २० मे २०२६ रोजी थेट इंटर्नशिप कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

सदर कॅम्पचे आयोजन महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेड, गेट क्रमांक २, महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड, चाकण, पुणे येथे बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून करण्यात आले आहे.

या कॅम्पअंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५०० तर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी १० अशा एकूण ५१० जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे. उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्ष आहे.

इच्छुक उमेदवारांनी अद्ययावत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, झेरॉक्स प्रती, आधार कार्ड अथवा जन्मदाखला, तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहेआले

00000

 

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार / उद्योजक मेळाव्याचे आयोजन

राज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta