vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नव्या मुंबईत 29 मे रोजी पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक 2026-27

नव्या मुंबईत 29 मे रोजी पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक 2026-27

    नवी मुंबई प्रतिनिधी  –  केंद्र शासनाकडील पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम 2014 चे मधील कलम 36 व्दारे पोट कलम (1) व्दारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ या राजपत्राव्दारे शहरांमधील पथविकेत्यांचे बाबत नियम व आदेश प्रसिद्ध केले होते. सदर शासनाच्या नियम आदेशामधील प्रकरण 4 मधील कलम 15 (भाग-1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे शहरातील पथ विक्रेत्याचे सर्वेक्षणाव्दारे नोंदणीकृत पथविक्रेत्यांची मतदारयादी तयार करून त्यांची निवडणूक घेणे अनिवार्य आहे.

 महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाने राजपत्र असाधारण भाग 4 अ अन्वये एकूण 08 सदस्यांची शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या पथविक्रेता निवडणूक नियम प्रणालीमध्ये नमूद केलेल्या एकूण 20 सदस्य संख्येध्ये 08 पथविक्रेते सदस्य असणार आहेत. सदरचे 08 पथविक्रेता सदस्य पथविक्रेता मधून निवडणुकीव्दारे निवडून द्यावयाचे आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ या शासन राजपत्राव्दारे अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, इमाव अल्पसंख्याक, विकलांग व्यक्ती व खुला प्रवर्ग या जातीय संवर्गचा उल्लेख केला आहे. तसेच 1/3 हे महिलांना आरक्षण देण्यात यावे, असे नमूद केलेले आहे.‌

त्यापैकी एक जागा सर्व साधारण महिलांसाठी राखीव आहे. दि.16 / 04 / 2026 रोजी पथविक्रेत्यांच्या उर्वरित 02 महिला राखीव जागा करीता आरक्षण सोडत पध्दतीने घेण्यात आली. यामध्ये 01 जागा अनुसूचित जाती महिला व एक जागा इतर मागास प्रवर्ग महिलांकरीता याप्रमाणे सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच वर नमुद केल्याप्रमाणे एकुण 08 पथविक्रेत्यांच्या सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून त्याचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.

अ.क्र. 1विषय :- नामनिर्देशन पत्राचे वाटप करणे दिनांक व वार :- 06/05/2026 बुधवार 07/05/2026 गुरुवार वेळ :- 11:00 ते दु. 03:00

स्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 6114

अ.क्र. 2 विषय :- नामनिर्देशन पत्र स्वीकारणे.

दिनांक व वार :- 14/05/2026 गुरुवार

वेळ :- 11:00 ते दु. 03:00स्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614

अ.क्र. 3विषय :- प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी करणेदिनांक व वार :- 15/05/2026 शुक्रवारवेळ :- 11:00 ते छाननी संपेपर्यंत

स्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614

अ.क्र. 4-विषय :- प्राप्त नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिध्द करणेदिनांक व वार :- 15/05/2026 शुक्रवारवेळ :- छाननीनंतरस्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614

अ.क्र. 5विषय :- आक्षेप अर्ज स्वीकारणेदिनांक व वार :- 19/05/2026 मंगळवार वेळ :- 11:00 ते दु. 03:00स्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614.

अ.क्र. 6 विषय :- वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे.दिनांक व वार :- 19/05/2026 मंगळवार वेळ :- दु. 03:00 नंतर स्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614

अ.क्र. 7 विषय :- नामनिर्देशन पत्र मागे घेणे

दिनांक व वार :- 20/05/2026 बुधवारवेळ :- सायंकाळी 5:00 वाजेपर्यंतस्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614

अ.क्र. 8विषय :- माघारी नंतरची अंतिम यादी प्रसिध्द करणेदिनांक व वार :- 20/05/2026 बुधवारवेळ :- सायंकाळी 5:00 नंतरस्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614.

अ.क्र. 9विषय :- मतदान घेणे दिनांक व वार :- 29/05/2026 शुक्रवार वेळ :- 07:30 ते सायं.05:00स्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614

अ.क्र. 10विषय :- मत मोजणी दिनांक व वार :- 29/05/2026 शुक्रवारवेळ :- सायंकाळी 06:00 पासुन,स्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614

अ.क्र. 11विषय :- निवडणुक निकाल जाहीर करणेदिनांक व वार :- 29/05/2026 शुक्रवारवेळ :- मतमोजणीनंतरस्थळ :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614.    याबाबत नगरपथविक्रेत्यांच्या प्रभागनिहाय मतदार यादया संबंधीत प्रभाग समिती (1,2,3,4,5,6,7 व 8) कार्यालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय (परवाना कक्ष) येथे नगरपथविक्रेत्यांच्या पूर्ण मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी महापालिका आयुक्त, नवी मुंबई व पथविक्रेता निवडणूक निर्णय अधिकारी, नवी मुंबई यांच्यामार्फत संबंधित सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, सदर निवडणुकीमध्ये सक्रीय सहभाग घेऊन सदरची निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास महानगरपालिकेस सहकार्य करावे.

0000

 

संबंधित पोस्ट

विधानपरिषद नियम क्रमांक २६० अन्वये चर्चेवर उत्तर-छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी ३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही· मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत माहिती

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

बालकांची खरेदी विक्री करणे तसेच बेकायदेशीररित्या बाळाला दत्तक देणे कायद्याने गुन्हा

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज

vishwatmaklokswamivarta

आखाती प्रदेशातील बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने संबंधित सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.