vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही-असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले

देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही-असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले

राज्य प्रतिनिधी-देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले संविधान संशोधन झाले होते पण त्यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ठोस इच्छाशक्ती दाखवली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नारी शक्ती वंदन महिला संमेलन’ कार्यक्रमात केले.

यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार मनीषा चौधरी, आमदार चित्रा वाघ, आमदार अमित साटम, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.उज्वला चक्रदेव, अभिनेत्री रविना टंडन, प्राजक्ता माळी, पार्श्वगायिका वैशाली सामंत, फॅशन डिझायनर अर्चना स्नेहलका स्वामी, ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित रुबल नेगी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

महिलांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गोष्टीत ऐतिहासिक बदल घडणार असून संसद व राज्य विधिमंडळात मोठ्या प्रमाणात महिला लोकप्रतिनिधी निवडून येतील. त्यामुळे महिलांच्या विकासाला आणि नेतृत्वाला नवी गती मिळेल, ‘नारीशक्ती वंदन विधेयक’द्वारे परिवर्तनासाठी सर्वांनी एकजुटीने पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या महिला व्यक्तिमत्त्वांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नारी शक्ती वंदन विधेयकसाठी दूरध्वनी क्रमांकावर मिस कॉल देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निमंत्रित प्रमुख मान्यवर महिला वक्त्यांनी समर्थनासाठी फलकावर स्वाक्षरी केली.

000000

संबंधित पोस्ट

टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्यादृष्टीने दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

vishwatmaklokswamivarta

पुणे येथील राजगुरुनगर मधील पीडित मुलींच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

vishwatmaklokswamivarta

मुख्याध्यापक सहविचार सभा,संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

इतर मागास संवर्गातील समूहांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ‘महाज्योती’चा कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव