vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार / उद्योजक मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार / उद्योजक मेळाव्याचे आयोजन

 

  गडचिरोली, प्रतिनिधी:गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, दे-आसरा फाऊंडेशन, आणि इनक्यूबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठ, कोटगल रोड गडचिरोली येथे दिनांक २५ मार्च २०२६ रोजी ११.०० वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार / उद्योजक मेळावा, आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर रोजगार/उद्योजक मेळाव्यामध्ये डॉ. रविंद्र अहेर (बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटजिस्ट), अमर नायसे (ब्रेन ऑप्टीमायझेसन कोच) व अनिरूदध आठवले (मेंटर इनफेड-IIM नागपूर) उपस्थित राहणार असून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करणार असून विविध नामांकित कंपन्या सुध्दा सहभागी होणार आहे

सदर रोजगार / उद्योजक मेळाव्याकरिता ईच्छूक असलेले उमेदवारांनी /उद्योजकांनी २५ मार्च २०२६ रोजी गोंडवाना विद्यापीठ, कोटगल रोड गडचिरोली येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहून रोजगार/उद्योजक मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने 23 व 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे ‘पर्यटनाचा महाकुंभ 2025’ चे आयोजन…

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जून – २०२५ चा मासिक व साप्ताहिकभव्य सोडतीचा निकाल जाहीर

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

vishwatmaklokswamivarta

रसायने व साहित्य खरेदीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत

तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन*18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत