vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सोयाबीन, तुर, मुग, उडीद प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थानी ऑनलाईन अर्ज करावेत -जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी

सोयाबीन, तुर, मुग, उडीद प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थानी ऑनलाईन अर्ज करावेत -जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी

नांदेड प्रतिनिधी:- कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिक घटकासाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. प्रात्यक्षिक लाभासाठी 31 मार्च 2026 पर्यंत नोंदणीकृत असलेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. खरीप हंगाम 2026-27 साठी महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra. gov.in /Farmer/ AgriLogin) अर्जाची विंडो उपलब्ध झाली असून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

या योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्य, गळीतधान्य, तृणधान्य, आणि कडधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे, जैविक खते, किटकनाशके, बीज प्रक्रिया औषधी इत्यादी निविष्ठांचा 10 हेक्टर (25 एकर) क्षेत्रावर प्रात्यक्षिकांचा लाभ देण्यात येणार आहे.

शेतकरी जवळच्या सेतू केंद्रावर, सीएससी केंद्रावर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करू शकतात. अर्जाची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असल्याने जिल्हयातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी लवकारात लवकर अर्ज करावेत. मागील दोन वर्षात पीक प्रात्यक्षिकांचा योजनेंअतर्गत लाभ घेतला असल्यास त्यांची यावर्षी लाभासाठी निवड केली जाणार नाही. शेतकरी गट/ कंपनी मधील केवळ फार्मर आयडी असलेले शेतकरी सदस्य लाभासाठी पात्र असणार आहेत असेही कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सैनिक कल्याण पुणे विभागात माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक पदांची भरती…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन

सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखकांची भरती; 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान,औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी 50 हजार ते 1.50 लाखांपर्यंत अनुदान33.50 लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी ;महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा- मनोजकुमार ढगे यांचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

पणन हंगाम 2024-25 योजनेंतर्गत धान खरेदी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta