vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अमडापूर येथे 8 मार्च रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

अमडापूर येथे 8 मार्च रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

बुलढाणा प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा, तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ चिखली, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा तसेच जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली तालुक्यातील जगदंबा बल्लाळ देवी संस्था, अमडापूर येथे दि. 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता विधी सेवा महाशिबिर, शासकीय सेवा योजनांचा महामेळावा व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या महाशिबिरामध्ये सुमारे ५० शासकीय स्टॉलद्वारे नागरिकांना विविध योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजना, आयुष्यमान भारत कार्ड, जात व उत्पन्न दाखले, नवीन रेशन कार्ड तसेच इतर विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय नागरिकांना नालसाच्या विविध योजना, लोकअदालत व मध्यस्थीचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात डोळ्यांची तपासणी, ओरल कॅन्सर तपासणी, दातांची तपासणी* आदी विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी व गरजू नागरिकांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अध्यक्ष आर. एन. रोकडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

फुले शाहू आंबेडकरांचे खरे वैचारीक वारसदार कांशीराम जी आहे ऍड साहेबराव सिरसाठ पुरस्कार व सन्मान सोहळा संपन्न मिळाल्याने चळवळी ला गती मिळते

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून त्यासाठी जलजागृती होणे आवश्यक- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ…

दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीटी मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्ज सादर करावेत

उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन-स्वयंसहाय्यता बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी

vishwatmaklokswamivarta

प्रासंगिक लेख / जयंती दिन विशेष-कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन