vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गावदेवी भाजी मंडई परिसरातील परिस्थ‍िती नियंत्रणात

गावदेवी भाजी मंडई परिसरातील परिस्थ‍िती नियंत्रणात

ठाणे प्रतिनिधी ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट येथे आज पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच आपत्कालीन विभाग, महावितरण तसेच नौपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील दाखल झाले.

  आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 फायर वाहनांसह 1 वॉटर टँकर, 2 रेस्क्यू वाहने तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी 1 पिकअप वाहनासह कार्यरत होते. अग्निशमन दल ठाणे आपत्ती प्रतिसाद दल,प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी या मदतीने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करुन दुपारी 12.30 वा.परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. सद्यस्थ‍ितीत सदर ठिकाणी कूलिंगचे काम सुरू असून शुक्रवारपासून तेथे साफसफाईचे काम हाती घेण्यात येणार आहे.

    घटनास्थळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, माजी नगरसेवक संदीप लेले यांनी भेट देवून परिस्थ‍ितीची पाहणी केली.

महापौरांनी घेतली जखमीची भेट गावदेवी भाजी मंडई परिसरातील आग विझवताना जखमी झालेले अग्निशमन दलातील कर्मचारी सुजित पष्टे (45), समीर जाधव (40) यांची महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जावून भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांच्यासमवेत त्यांच्या उपचाराबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक मुकेश मोकाशी, उपायुक्त दीपक झिंजाड उपस्थित होते 0000

संबंधित पोस्ट

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

पनवेल महानगरपालिका आणि इनरव्हिल क्लब आफॅ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रम

…पुढील ३ तासात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळीवारे वाहण्याची दाट शक्यता… हवामान खात्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल

दिशा समितीच्या बैठकीत जलजीवन मिशन, महावितरण, रस्ते विकासासह विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा व सूचना

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशोत्सवाच्या राज्य महोत्सवांतर्गत नवी मुंबईत 3 सप्टेंबरला भव्यतम ‘कलागणेश महोत्सव’

vishwatmaklokswamivarta