vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…

पुणे प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.७ वी) २६ एप्रिल, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता नियमित शुल्कासह ६ मार्च, २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र / शुल्क भरणा करण्याकरीता वाढीव मुदत मिळण्यासाठी परीक्षा परिषदेस अनेक शाळांकडून विनंती प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. विलंब शुल्कासह ८ मार्च आणि अतिविलंब शुल्कासह १० मार्च पर्यंत ही मुदत असेल.

सदर परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिलेल्या मुदतीत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. १० मार्च २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाहीत याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

विभागीय माहिती कार्यालय, पुणे

संबंधित पोस्ट

राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; ३६४ पदांना, त्यासाठीच्या खर्चास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्र राज्य कर विभागामार्फत बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २०.२० कोटी रुपयांची करचोरी उघड..

vishwatmaklokswamivarta

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली.

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय-मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळतील  .

मुंबई शहर जिल्ह्यात २३ व २६ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान