vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग    विषयावरील कार्यशाळा संपन्न

भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग    विषयावरील कार्यशाळा संपन्न

 

सातारा प्रतिनिधी: केंद्रीय भूजल विभाग, पुणे यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे “केंद्रीय भूजल विभागाचे भूजल माहिती भंडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग व ” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 कार्यशाळा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी वरिष्ठ भूजलवैज्ञानिक उपेंद्र धोंडे, पाणी फाउंडेशन डॉ . अविनाश पोळ, प्रज्ञा माने-भोसले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, डॉ. मेघा शिंदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे गौरव चक्के, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, अरुण दिलपाक यांच्यासह राजेंद्र शेलार, बाळासाहेब शेंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थितीत होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी भूजल माहिती प्रसारामध्ये CGWB च्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी CGWB आणि GSDA च्या भूजल डेटाबेसचा वापर करून सर्व संबंधित विभागांमध्ये सुसंवादी आणि व्यापक धोरण अंमलबजावणीसाठी गरज असल्याचेही त्यांनी सांगितले

श्री. धोंडे यांनी राष्ट्रीय माहिती प्रसारण धोरण यावर सादरीकरण केले तसेच सातारा जिल्ह्यासाठीचे राष्ट्रीय एक्विफर मॅपिंग (NAQUIM) निष्कर्षही सादर केले. तसेच CGWB डेटा पोर्टल, INGRES, आणि WRIS चा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दिले तसेच माहिती प्रसारण संदर्भातील सुसंवादाने क्षेत्रीय स्तरावर नियोजन आणि निर्णय घेण्यास मदत असेही त्यांनी सांगितले.

 डॉ. अविनाश पोळ यांनी प्रभावी जलव्यवस्थापनाची गरज अधोरेखित केली आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या तांत्रिक माहितचा स्थानिकस्तरावर प्रभावी वापर करण्याचे आश्वासन दिले.

डॉ . मेघा शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध विभागांना या संसाधनांचा जिल्हास्तरीय नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये, विशेषतः गावातील जलसुरक्षा योजनांच्या तयारीत सक्रियपणे वापर करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करणार असल्याचे सांतगितले. कार्यशाळेत कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा” या कॉफी टेबल पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन करण्यात आले.

0000

 

संबंधित पोस्ट

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत- पालक सचिव विनिता वेद सिंग,100 दिवस कृती आराखड्यांतर्गत घेतला प्रमुख विभागांच्या कामांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर 

जामिया उर्दू अलीगढची जालना कॉलेज ऑफ सोशल वर्कला अध्ययन केंद्राची मान्यताअदीब व अदीब-ए-माहिर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ जालना, सुंदर जालना! 🧹✨

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित ‘खासदार क्रीडा महोत्सवा’स पुणे येथे सुरूवात, 15 दिवस 35 स्पर्धांचे आयोजन विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना आरोग्य संपन्नतेलाही तितकेच महत्त्व – मुरलीधर मोहोळ क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला मिळणार बळकटी – अंजली भागवत

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन उत्साहात

vishwatmaklokswamivarta