vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

घनसावंगी विधानसभेतून गोविंद ढेंबरे यांना विधान परिषदेसाठी संधी द्यावी – भाजप कार्यकर्त्यांचा एकमुखी ठराव,पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या कार्याचा गौरव • स्थानिक नेतृत्वाला न्याय देण्याची मागणी

घनसावंगी विधानसभेतून गोविंद ढेंबरे यांना विधान परिषदेसाठी संधी द्यावी – भाजप कार्यकर्त्यांचा एकमुखी ठराव,पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या कार्याचा गौरव • स्थानिक नेतृत्वाला न्याय देण्याची मागणी

राज्य प्रतिनिधी-केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचननुसार भारतीय जनता पक्षाच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत गोविंद नामदेव ढेंबरे यांना महाराष्ट्र विधान परिषदेसाठी आमदार म्हणून संधी द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीत सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.या बैठकीत ढेंबरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण आणि निष्ठावंत कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविणे, कार्यकर्त्यांना बळ देणे आणि पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे यामध्ये त्यांचे मोठे योगदान असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यकर्त्यांनी असेही नमूद केले की, घनसावंगी विधानसभा मतदारसंघात पक्ष अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी स्थानिक व समर्पित नेतृत्वाला संधी देणे अत्यंत आवश्यक आहे. ढेंबरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.या ठरावाला सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने पाठिंबा दर्शविला असून, लवकरच हा ठराव पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर निर्माण झालेली ही एकजूट आणि पाठिंबा लक्षात घेता, ढेंबरे यांच्या उमेदवारीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

संबंधित पोस्ट

सक्षम नसलेल्या महिला भगिनींना राजकीय, सामजिक आणि आर्थिक बळ देवू,महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध  — वनमंत्री गणेश नाईक

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार

अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार;बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत  ‘श्री राजमातंगी महायज्ञ’१७ मे या दिवशी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागील नर्दुल्ला टँक मैदानात दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत यज्ञसोहळा चे आयोजन