vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

*स्व.शब्बीर अंसारी यांना धार्मिक पातळीवर विरोध असतांनाही मुस्लिम ओबीसींना न्याय मिळवून दिला*सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली*

*स्व.शब्बीर अंसारी यांना धार्मिक पातळीवर विरोध असतांनाही मुस्लिम ओबीसींना न्याय मिळवून दिला*सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली*

जालना : प्रतिनिधी मुस्लिम ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांसाठी अनेक वर्षे लढा देणारे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष स्व. शब्बीर अहमद अन्सारी यांच्या कार्याला समाजात मोठे महत्त्व होते. अनेक अडचणी आणि विरोधाचा सामना करत असतानाही त्यांनी कधीही मागे हटणे स्वीकारले नाही. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे केंद्र व राज्य शासनाकडून मुस्लिम ओबीसी समाजाला हक्क मिळवून देण्यात यश आले आणि एक सामाजिक क्रांती घडून आली.

स्व. अन्सारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना नेते भास्कर अंबेकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, स्व. अन्सारी यांचे नेतृत्व ओबीसी समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी होते.

उपमहापौर राजेश राऊत यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, स्व. शब्बीर अन्सारी हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशातील एक क्रांतिकारी नेते होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांच्या प्रसारासाठी समर्पित केले. वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे कार्य जनता कधीही विसरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. संजय राख यांनी सांगितले की, शब्बीर अंसारी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसी समाजासाठी कार्य केले. त्यांचे राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांशी जवळचे संबंध होते; मात्र त्यांनी कधीही स्वतःसाठी काहीही मागितले नाही. त्यांचा निःस्वार्थ स्वभाव सर्वांसाठी आदर्श होता.ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा यांनी सांगितले की, शब्बीर अंसारी हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ओबीसी समाजाची चळवळ उभी केली. आज देशपातळीवर त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मुस्लिम ओबीसी समाजासाठी त्यांनी केलेले कार्य आम्ही कधीही विसरू शकत नाही.

एक निःस्वार्थ, ध्येयवेडा आणि कुशल संघटक आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. मात्र त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुश देशमुख, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेद्र राख, अब्दुल हफीज, राष्ट्रवादी शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शेख मेहमूद,वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डेव्हिड घुमारे , मराठा महासंघाचे अरविंद देशमुख, बाराबलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्यानराव दळे, जमाते इस्लामी हिंदचे अब्दुल मुजीब शहर काँग्रेसचे अध्यक्ष अतिक खान काँ. सगीर अहेमद रिझवी, राजेश ओ राऊत, अविनाश चव्हाण, कार्य अध्यक्ष मिर्झा अन्वर बेग, अहेमद नूर कुरेशी, शिवसेनेचे दिनकर घेवंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जाधव, बसपाचे किशोर बोर्डे, माजी जि.प.सदस्य राम सावंत, आप पार्टीचे फिरोज बागवान, कुणबी सेनेचे विष्णू कदम, शकील खान, सामाजिक कार्यकर्ते मोहन इंगळे, आदींनी श्रद्धांजली पर बोलताना स्व. शब्बीर अंसारी यांच्या जिवन आणि त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करून आपल्या भाषणातून श्रद्धांजली अर्पित केली.

स्व. शब्बीर अंसारी यांचे पुत्र इलियास अंसारी, गुफरान अंसारी, एजास अंसारी यांची यावेळी उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सत्संग मुंढे यांनी करून स्व. शब्बीर अंसारी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ओबीसीचा लढा उभारून अथक परिश्रमातून देशपातळीवर ओबीसी समजात जागरूकता निर्माण केली असे सांगून त्यांच्या संपूर्ण कार्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी संजय इंगळे, गणेश सुपारकर, सतीश वाहुळे , कलीम खान, शिवराज जाधव, शफी मुसा,नगरसेवक आमेर खान, आसेफ अंसारी, सय्यद रहीम, इम्रान खान, सुरेश कांबळे, रमेश मुळे, शेख शकील, शेख वसीम,विजय सोनवणे, अजीम बागवान, गप्फार बेग, जावेद अली, संतोष निकाळजे आदि विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह ! राज्यात ६० हून अधिक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..

vishwatmaklokswamivarta

एकाच दिवशी 400 जणांना नियुक्तीचे आदेश*अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे*लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा…

आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला सक्षमीकरणातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील,नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी कालावधीत कृषीपर्व महोत्सव

vishwatmaklokswamivarta

पर्यटन वृद्धीसाठी महिला केंद्रीत ‘आई’ धोरण

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर. 

खरीप 2025 हंगामासाठी अन्नधान्य व वाणिज्यिक पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत पिकांच्या अनुदानावरील प्रमाणित बियाण्यांकरिता अर्ज करावेत