vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पनवेल महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना 34 टन शाडू मातीचे मोफत वाटप!उप आयुक्त श्री. स्वरूप खारगे यांच्याकडून शाडू मातीचे वितरण व गणेशमूर्ती कारखान्याला भेट..

पनवेल महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना 34 टन शाडू मातीचे मोफत वाटप!उप आयुक्त श्री. स्वरूप खारगे यांच्याकडून शाडू मातीचे वितरण व गणेशमूर्ती कारखान्याला भेट..

राज्य प्रतिनिधी-पनवेल शहरामध्ये शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू मातीचे वाटप आज करण्यात आले .श्रीगणेशोत्सव सन २०२५ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्वरूप खारगे यांनी पर्यावरण विभागामार्फत नियोजन व कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, मागीलवर्षी 20 पेक्षा अधिक मूर्तिकारांना 12 टन इतकी माती मोफत देण्यात आली होती. मात्र यंदा उत्सवाच्या व्यापकतेनुसार मातीचा पुरवठा वाढविण्यात आला आहे. यावर्षी 24 पेक्षा अधिक मूर्तिकारांनी 34 टन इतकी शाडू माती पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार दिनांक २६ जुलै रोजी आज कुंभारवाडा, पनवेल येथे उप आयुक्त स्वरूप खारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाडू मातीचे वाटप व मूर्ती कारखान्याला भेट देण्यात आली. यावेळी 34 टन इतकी शाडू माती मूर्तिकारांना मोफत वाटप करण्यात आली आहे.

या प्रसंगी उप आयुक्त श्री. स्वरूप खारगे यांनी गणेश मुर्ती कारखान्यांना भेट देऊन मूर्तीकारांशी संवाद साधला व त्यांना पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. मूर्तिकारांनी पीओपी, केमिकल रंग व प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करत शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्यावर भर देण्याचे सांगितले. उप आयुक्त खारगे यांच्या झालेल्या या भेटी दरम्यान स्थानिक मूर्तिकारांकडून शाडू मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती त्यांना सप्रेम भेट देण्यात आली.

पनवेल महनगरपालिका प्रशासनाकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सव राबविण्याच्या अनुषंगाने मूर्तिकारांना निरनिराळ्या सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक उत्सवासाठी सर्व बाबींचा अवलंब केला जात आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांसाठी महानगरपालिकेच्या उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास प्राधान्य’ या तत्वावर पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विक्रीसाठी जागा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत . याच अनुषंगाने शाडू माती वाटप उपक्रमामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिकारांचे योगदान व नागरिकांचा सहभाग निश्चितच वाढीस लागेल, असा विश्वास उप आयुक्त स्वरूप खारगे यांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमास पर्यावरण विभागाचे प्रमुख मनोज चव्हाण, लिपिक प्रवीण व्हलगळ, तसेच पनवेलमधील प्रमुख मूर्तिकार अनंत चिरनेरकर, नरेश कुंभार, गजानन वाजेकर, राहुल घोंगे इत्यादीसह नागरीक उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

एकल प्‍लास्‍टीक यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्‍यावर भर – अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अर्जुन गिराम.

vishwatmaklokswamivarta

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या नियोजनाचामहिला व बाल विकास मंत्री कु तटकरे यांनी घेतला आढावा..

धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य महोत्सव गणेशोत्सवाची व्यापकता राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta