vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी: धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कायेदशीर तोडगा काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याच्या महाधिवक्ता यांच्या सोबत बैठकीचे तातडीने आयोजन करण्यात येईल, जेणेकरुन धनगर बांधवाच्या आरक्षणासंदर्भात कायदेशीर दिशा स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणासंदर्भात समाजाच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रामराव वडकुते, शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर समाजाचे ऐतिहासिक योगदान भरीव आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारे असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्याच्या महाधिवक्ता यांच्यासोबत धनगर समाजातील या विषयाचा अभ्यास असलेल्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन तातडीने करण्यात येईल. त्यातुन आरक्षणासाठीची कायदेशीर दिशा स्पष्ट होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देताना सर्व बाजू तपासून त्याची खातरजमा करुन आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, विधि न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, पदुम सचिव डॉ रामास्वामी एन. आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली.

संबंधित पोस्ट

निराधार योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अव्वल !उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…

मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी,गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी..

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लालबागचा राजाचा 2025 विसर्जन सोहळा थेट प्रक्षेपण पहा “विश्वात्मक लोकस्वामीवार्ता” वेब पोर्टलवर-:-https://vishwatmaklokswamivarta.com/ या घ्या गणपती बाप्पाचे दर्शन गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या….

vishwatmaklokswamivarta

गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळाचे गणपती उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क…

महाराणा प्रताप सिंहांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील