vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

रायगड, प्रतिनिधी:-सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची (शिधापत्रिकाधारक) ई- केवायसी असणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. लाभार्थ्यांचे शिधापत्रिकासोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद असलेली व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड सर्जेराव सोनावणे यांनी केले आहे.

शिधापत्रिकांसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांकाचे प्रमाणिकर पूर्ण करण्यासाठी व रास्तभाव दुकानस्तरावर ई-केवासयी मोहिम राबविण्यात येत आहे. शासनाचे निर्देशान्वये धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांची 100 टक्के ई-केवायसी करण्याबाबत सुचित केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये 75.72 टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. शासनाच्या पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांची ई-केवायसी करण्यासाठी शासनाने दिलेली मुदतवाढ 30 जून रोजी संपली आहे. यापुढे ई-केवायसी करण्याकरिता शासनाकडून मुदतवाढ मिळणार नाही.

अद्यापही ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याकरिता आपण धान्य घेत असलेल्या नजिकच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये जावून ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. तसेच अनेक शिधापत्रिकाधारकांचे अंगठे ई-पॉस मशीनवर स्कॅन होत नव्हते, यामुळे आता या शिधापत्रिकाधारकांचे ई-पॉस मशीनवर डोळे स्कॅन करुन (IRIS Scanner चा वापर करुन) ई- केवायसी प्रक्रीया पुर्ण करता येत आहे. तसेच ई-केवायसी करण्याकरिता Mera eKYC हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन त्याद्वारे देखील KYC करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पुढील 1 महिन्यात ई-केवायसी न केल्यास आपल्या शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थी यांची राहील.

 

००००००

संबंधित पोस्ट

तंत्रज्ञानाच्या उपयोगाने प्रशासनात सुलभता आणावी-विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल* विभागीय महसूल परिषदेत विविध महत्वपूर्ण विषयांवर मंथन*

vishwatmaklokswamivarta

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

मानवी जाणिवा कायम ठेवून प्रशासकीय कामकाज करा- ॲड. धर्मपाल मेश्राम पारधी समाज बांधवांची विविध विषयावर निवेदने, मागण्या सादर..

अथर एनर्जी लि.च्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट,सामाजिक उत्तरदायित्व निधीतून महिलांचेआरोग्य, कुपोषण इ. क्षेत्रात योगदान देणार..

vishwatmaklokswamivarta

वस्तीशाळेवरील स्वयंसेवकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन स्तरावर चर्चा करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

आदिवासी आश्रमशाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी  आज शहापूरमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन