vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन सोमवारी(4 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद

डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन सोमवारी(4 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद

बुलढाणा, प्रतिनिधी : भारतीय डाक विभाग आपल्या सेवा प्रणालीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘आय.टी. 2.0’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत एपीटी (APT) अप्लिकेशन ही नवीन डिजिटल प्रणाली कार्यान्वित करत आहे. या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे डाक व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार असून, यामुळे पोस्ट ऑफिसमधील सेवा आणखी सक्षम होणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाखा टपाल कार्यालये व उपडाकघरांमध्ये ही प्रणाली मंगळवार दि. 5 ऑगस्ट 2025 पासून लागू करण्यात येत आहे. या संक्रमणासाठी आवश्यक असलेल्या डेटाच्या स्थलांतराची प्रक्रिया सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी पार पडणार असल्याने त्या दिवशी (दि. 4 ऑगस्ट रोजी) बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे महत्त्वाची कामे 4 ऑगस्टपूर्वीच पूर्ण करावीत, जेणेकरून व्यवहारात अडथळा येणार नाही, अशी माहिती अधिक्षक डाकघर, बुलढाणा यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधीआपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीत जनजागृतीची प्रभावी मोहीम

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन  

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!२२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत राज्यात विविध उपक्रम साजरे होणार – पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी

जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर