vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन

ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन

छत्रपती संभाजीनगर – प्रतिनिधी
आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका जाहीर सभेत ख्रिश्चन धार्मिक गुरूंना मारणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, या अत्यंत धक्कादायक आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विधानाच्या निषेधार्थ अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने आज पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात आमदार पडळकर यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवावा, तसेच त्यांच्या आमदारकीवर कारवाई करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे शहराध्यक्ष श्री. जॉन आव्हाड, जिल्हाध्यक्ष श्री. नितीन गायकवाड, कायदा सल्लागार अ‍ॅड. श्री डॅनियल टाकवले हे उपस्थित होते.
पा.आकाश उजागिरेतसेच सिटी युथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. यामध्येशहराध्यक्ष – विराज शेजुळ
शहर उपाध्यक्ष – रोहन पाटोळे
कोषाध्यक्ष – स्वप्निल कांबळे
संघटक – प्रतीक मंडलिक
तसेच जुलिअस हिवाळे, विशाल घोरपडे, विनोद कुचेकर आदींचा समावेश होता.

हा प्रकार धार्मिक तेढ वाढवणारा असून त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली

संबंधित पोस्ट

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

पद्मपुरस्कार २०२७ साठी नामांकन/ शिफारसी मागवण्याची प्रक्रिया १५ मार्च २०२६ पासून सुरु झालेली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ …

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

vishwatmaklokswamivarta

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार· जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

धर्मगुरू आसाराम बापू याच्या अंतरिम जामीनास वैद्यकीय कारणास्तव मुदतवाढ, तीन महिने तुरुंगाबाहेर राहण्यास सवलत