vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) – पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरात असणारे फार्म हाउस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर दि.२९ जानेवारी २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इ. च्या आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स याचा वापर करु नये. कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृष्यात अडथळा निर्माण होऊन लॅंडीग व टेकऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा;कार्यतत्पर राहून आरोग्य यंत्रणेने काम करावे – डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट-भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार..

मॅजिक आयटीआय जालना इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना उद्योजक होण्याची संधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा  ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ चे उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने पी 8-आय विमानातून स्वदेशी ‘एडीसी-150’ एअर ड्रॉपेबल कंटेनरच्या घेतल्या यशस्वी चाचण्या

फार्मर आयडी 20 मे 2026 पूर्वी काढण्याचे आवाहन