vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण…

 

        सांगली, प्रतिनिधी) : सांगली शहर येथील खणभाग सि.स.नं. १ मधील खाजगी मिळकत धारक यांचे सत्ता प्रकार ‘एल’ मधून ‘ए’ मध्ये रुपांतरीत केलेल्या मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.     जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठीया, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, नगर भूमापन अधिकारी, कर्मचारी, मिळकतींचे मिळकत धारक उपस्थित होते.       सांगली शहर खणभाग येथील सत्ता प्रकार ‘एल’ या धारणाधिकार सत्ताप्रकाराच्या शासकीय जमिनीचे ‘ए’ या सत्ताप्रकारात रूपांतरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजीच्या निर्णयानुसार एकूण 64 मिळकतीचे रूपांतरण करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये 60 मिळकतीस जिल्हाधिकारी यांच्याकडील दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशाने मिळकतीवर फेरफार घेण्यात आला. सदर मिळकत पत्रिकेस सत्ताप्रकार ‘एल’ (सरकारी जागा व इमारती) हा 1928 साली दाखल झाला होता. तो ‘ए’ करण्यात आल्यावर संबंधित मिळकत धारकास दिलासा मिळाला आहे. झालेल्या कार्यवाहीबाबत मिळकत धारकांनी समाधान व आभार व्यक्त केले

संबंधित पोस्ट

पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

अमृत दुर्गोत्सव 2025’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ! शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

vishwatmaklokswamivarta

कोकणातील सागरी महामार्गाचे काम सुरू असून मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करणार आणि मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे देखील तयार करणार अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *प्रयागराज कुंभमध्ये हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदू एकता पदयात्रा’ *कुंभमेळ्यामध्ये घुमला ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष!

vishwatmaklokswamivarta

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे