vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, प्रतिनिधी: डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवावा याबाबतची कार्यवाही विभागाने जलदगतीने करावी, अशा सूचना कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या.मंत्रालयात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी आमदार मनीषा चौधरी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक काशीद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.वाय.सी.साळे, डॉ.एस.एस.नारखेडे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत कृषी विभाग सकारात्मक आहे. सध्या पालघर येथे एकही शासकीय कृषी महाविद्यालय नाही तसेच महाविद्यालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. येथील जनतेची मागणी लक्षात घेता याबाबत कृषी विभागाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

*******

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

शस्त्र परवाना नुतीनकरण करुन घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा १ मार्च रोजी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta