vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी…

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी…

      जालना प्रतिनिधी:- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. या कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर येथील नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार असुन मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी तसेच निवडणुक प्रक्रिया मुक्त व शांततामय मार्गाने होणे आवश्यक आहे. तरी जिल्हाधिकारी, जालना यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान झालेल्या अधिकारानुसार जालना जिल्ह्यातील नगरपरिषद निर्वाचन क्षेत्रातील सर्व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य विक्री करणाऱ्या अनुज्ञप्त्यांचे (सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4 आणि एफएलबीआर-2) व्यवहार दि.1 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी संपुर्ण दिवस, दि. 2 डिसेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी आणि दि.3 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी संपुर्ण दिवस पुर्णत: बंद ठेवावी. असे आदेश जिल्हाधिकारी, जालना यांनी जारी केले आहेत

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त खिडक्या- खासदार नरेश म्हस्के यांचे प्रवासी संघटनेने मानले आभार

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन

बहुचर्चित उदयपूर फाइल्स चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने घातली बंदी..

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ निर्णय….

vishwatmaklokswamivarta