vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

अलिबाग (जिमाका)— जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने किमान कौशल्य विकास DPC २०२४-२५ अंतर्गत अलिबाग जिल्हा कारागृह वर्ग २ मधील बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि.२१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले. त्यांनी कारागृहातील बंद्यांना Laundry Service Provider आणि Two Wheeler Service Technician या कोर्सेसची माहिती देत त्याद्वारे भविष्यात स्वावलंबी कसे होता येईल यावर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणासाठी प्रगती स्किल डेव्हलपमेंट सेंटर, पनवेल हे संस्था म्हणून सहकार्य करणार आहेत. संस्थेचे संचालक श्री. रविकांत चव्हाण यांनीही उपस्थित राहून प्रशिक्षणाचा आराखडा सादर केला. दि. २४ फेब्रुवारी २०२५ पासून या प्रशिक्षण वर्गांना सुरुवात होईल.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत अलिबाग जिल्हा कारागृहाचे अधीक्षक, अशोक कारकर यांनी बंद्यांना प्रशिक्षणामुळे होणाऱ्या फायद्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट केले की हे प्रशिक्षण केवळ एक कौशल्य संपादन करण्याचे साधन नसून, त्यातून बंद्यांना नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल.
श्री. कारकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केलेल्या श्रीम. पवार आणि प्रगती स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
000

संबंधित पोस्ट

जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालयात नवनिर्वाचित पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा आयोजित जिल्हा बैठकीत सत्कार सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी..!!

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर प्लॉट विक्रीतून कोट्यवधींची फसवणूक  कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त  कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी