vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालयात नवनिर्वाचित पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा आयोजित जिल्हा बैठकीत सत्कार सोहळा संपन्न

जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालयात नवनिर्वाचित पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा आयोजित जिल्हा बैठकीत सत्कार सोहळा संपन्न

 

जालना (प्रतिनिधी) : – राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय जालना येथे आयोजित जिल्हा बैठकीत (दि.०१) प्रथम आगमन झाल्याबद्दल जालना भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमानाने भव्य सत्कार सोहळा करण्यात आल.

या प्रसंगी आ.संतोष पाटील दानवे, माजी आ.विलासबापू खरात, विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, रामेश्वर पाटील भांदरगे, सुनील आर्दड, विमलताई आगलावे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महानगराध्यक्ष सतीष जाधव, सोपान पेंढारकर, सर्जेराव जाधव, सिद्धिविनायक मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   यावेळी पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचे भाग्य मला लाभले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांना सोबत घेउन जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचे व जिल्ह्याच्या विकासासाठी जे शक्य होईल ते प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपा सदस्य नोंदणी अंतर्गत ज्या पदाधिकाऱ्यांनी एक हजार सदस्य नोंदणी केली त्यांचा पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते भास्कर (आबा) दानवे, शालिकराव म्हस्के, पुष्पाताई म्हस्के, सतीष जाधव, उमेश अग्रवाल, संतोष लोखंडे, कविता खोत, सुरेश दिवटे, दत्तात्रय पंडित, ज्ञानेश्वर भागिले, गणेश डोळस, अजिंक्य वाघ, अनिल सरकटे, राजू छल्लारे, राजू साळवे यांचा सत्कार केला.

यावेळी जालना जिल्ह्यातील व जालना महानगरातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, प्रभारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप-विकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण सुधारित कार्यक्रम जाहीरसांगली जिल्ह्यात 93.98 टक्के मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- बीएलओमार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 17 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार- नागरिकांना मतदार यादीतील माहिती अचूक राहण्यासाठी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील धरणे, जलसाठ्यांचे सप्टेंबरपर्यंत सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’ला ऐतिहासिक उड्डाण मुख्यमंत्र्यांकडून विमानतळावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

जालना मध्ये स्थानिक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…

लोककल्याणकारी कामांतून जनतेचे प्रश्न सोडवा- पालकमंत्री शंभूराज देसाई