vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन

जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन

जालना,(प्रतिनिधी)-हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवूनशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शहरातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आदींचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, माजी सभापती देवनाथ

जाधव, शहर प्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले,माजी नगरसेवक जे.के. चव्हाण, गंगुताई वानखेडे, विजय पवार, मंजुषा घायाळयांची उपस्थिती होती.विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुखभास्करराव अंबेकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षसंघटनेत ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हा मूलमंत्र घालून दिला.त्याप्रमाणे मुंबईसह राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर,रुग्णवाहिका, गोरगरिबांना मदत, कोणतत्याही अडी-अडचणीच्या व संकट समयीशिवसैनिक सर्वात अगोदर धाऊन जातो. त्याच्या गळ्यातील भगवा रुमाल हाशिवसैनिकांची ओळख बनला. राज्यभर पक्षाच्या उभारलेल्या शाखांचे जाळे बाळासाहेबांची कल्पकता होती. या शाखा सामान्य माणसाला मोलाचा आधार

वाटायच्या.दुर्दैवाने आजच्या बदलत्या परिस्थितीत राजकारण सत्ता व गुत्तेदारी भोवती फिरत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारामुळे सामान्य माणूस आमदार, खासदार,मंत्री होऊ शकला पण पुढे अनेकांनी पक्ष सोडला. परंतु आजही सामान्य माणूस मात्र बाळासाहेबांच्या विचारासोबत ठाम उभा आहे. त्यामूळे तरुण पिढीने

केवळ सत्तेसाठीच नव्हे तर सामाजिक कार्यासाठी तत्पर राहावे व शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सोबत काम करावे. असे आवाहन शिवसेनाजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले. यावेळी दर्शन चौधरी, जीवनखंडागळे, सखावत पठाण, गणेश लाहोटी, अजय रोडे, सावता तिडके, रामेश्वरकूरील यांच्यासह आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.रक्तदान शिबीराला प्रतिसाद

हिंदुर्‍हदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याजन्मदिनानिमित्त शहरातील मोरांडी मोहल्ला येथे रक्तदान शिबिराचे आयोजनकरण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरयांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन दिनकर चोरमारे यांनी केले व हे रक्तदानयशस्वी करण्यासाठी विनोद भालेकर, भगवान बारवकर, नामदेव तिडके, विलासयेवले, महेश भालेकर, अक्षय चोरमारे, अभिषेक जोगदंड, किरण चोरमारे, कैलासभालेकर यांनी परिश्रम घेतले.

००००

संबंधित पोस्ट

दि.5ऑगस्ट रोजी पनवेल येथे जनता दरबाराचे आयोजन ….       

नांदेड जिल्ह्यास दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाख जमा18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी’एक जिल्हा एक नोंदणी’व शनिवार-रविवार कार्यालय सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद,मध्यस्थांना फाटा देऊन थेट नोंदणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मराठा आरक्षण उपसमितीची बैठक

vishwatmaklokswamivarta

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

अवैध गौणखनिजाच्या उत्खनन, वाहतुकीवर प्रशासनाची कारवाई*एक कोटी 43 लक्ष दंडाची वसूली