vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

‘त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

 

        बुलडाणा, प्रतिनिधी अभिषेक पडवळ या एक वर्षाच्या बालकाला त्यांच्या नातेवाईकांनी बाल कल्याण समितीकडे दि. 9 नोव्हेंबर रोजी सुपूर्त केले. तेव्हापासून बालकाला यशोधाम लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन बुलढाणा येथे ठेवण्यात आले असून बालकाच्या पालक व रक्तसंबधातील नातेवाईकांनी अद्यापर्यंत संपर्क साधला नाही. सदर बालकाच्या पुनर्वसनासाठी दत्तक विधान मुक्त करणे आवश्यक असल्याने बालकाच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांनी 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

बालक नामे साई ऊर्फ अभिषेक पडवळ या बालकाला त्यांची काकू नामे वंदना हरसिंग पडवळ रा. नागझरी ता.खामगाव यांनी बाल कल्याण समितीकडे स्वाधीन केले होते. या बालकाला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार यशोधाम, दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. दाखल केल्यापासून या बालकाची विचारपूस, सांभाळण्यासाठी किंवा ताबा घेण्यासाठी कोणीही आलेले नाहीत. सदर बालकाचे पुनर्वसनासाठी दत्तक विधान मुक्त करणेकरिता विधी मुक्त करणे आवश्यक असल्याने बालकाचे कोणी रक्तसंबंधातील नातेवाईक असल्यास त्यांनी 30 दिवसाच्या आत यशोधाम दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड, खामगाव रोड, सेंट जोसेफ स्कुल जवळ, सुंदरखेड ता.जि.बुलढाणा या संस्था येथे किंवा सामाजिक कार्यकार्ता रामेश्वर जाधव यांच्या मोबाईल क्र. 9552206503 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000000

संबंधित पोस्ट

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम..

सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त भाजपाची जिल्हा कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य घराघरात पोहोचवूया – जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरात सामाजिक कार्यक्रम राबविणार – महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

विशेष वृत्त-मुरघास संयंत्र वाटप योजना: पशुपालकांना उद्योजक होण्याची संधीपशुपालक व शेतकरी समुहगटांना लाभ घेण्याचे आवाहन 

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta