vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त भाजपाची जिल्हा कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य घराघरात पोहोचवूया – जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरात सामाजिक कार्यक्रम राबविणार – महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त भाजपाची जिल्हा कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य घराघरात पोहोचवूया – जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरात सामाजिक कार्यक्रम राबविणार – महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : – भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हा व जालना ग्रामीण जिल्हा तर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त (ता.२१) कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि आयोजित केलेल्या प्रदर्शनी बघून कार्यकर्त्यांनी त्यांच्या जीवन कार्य आत्मसात केले. यावेळी भाजपा प्रदेश वक्ते किशोरजी शितोळे, सदस्य नोंदणी प्रभारी किरणजी पाटील, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना प्रदेश वक्ते श्री.शितोळे म्हणाले की, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील असून अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी आहे. अहिल्यादेवी यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक संकटे त्यांच्यावर आली. परंतु त्यांनी न डगमगता धैर्याने या सर्व संकटांना तोंड दिले असे हि ते म्हणाले.

महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक सामाजिक कामे केली, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक नद्यांवरील घाटांची दुरुस्ती केली, अनेक नवीन घाट बांधले, महिला सबल आणि सक्षम होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भारतीय जनता पार्टीतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन राबविण्यात येत आहेत. यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी निर्माण केलेले घाट, मंदिर, स्मारक यांची स्वच्छता करणे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावरील चित्ररथ, शोभायात्रा, महिला मेळावे, युवा मेळावे, महिला मॅरेथॉन, पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन सामाजिक कार्य करणाऱ्या महिला व सोशल मीडियातील प्रभावी व्यक्ती यांचे संमेलन, राजमाता अहिल्यादेवी यांच्या जीवन व कार्यावर प्रदर्शनी करणे हे सर्व कार्यक्रम भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नागरिकांना सोबत घेऊन वरील सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करावेत आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदरांजली द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री.दानवे यांनी यांनी केले.

जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे म्हणाले की, अहिल्यादेवींनी ३०० वर्षांपूर्वी दिलेले योगदान, जनविकासाची केलेली कामे राज्यभर पोहोचविण्याचा प्रयत्न मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार करत आहे. अहिल्यादेवींचे कार्य शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे ध्येय मनात ठेवून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपला भाजपा परिवार कटिबद्ध आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य घराघरात पोहोचवूया; वारसा जपत समाजसेवेकरिता कटिबद्ध होऊया, पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून राजमाता अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याच्या जागर 21 मे ते 31 मे या कार्यकाळात आपणास संपूर्ण जिल्ह्याभरात राबवयाचे आहे. यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रदेश निमंत्रित सदस्य राजेशजी राऊत, रामेश्वर पाटील भांदरगे, विजय कामड, विमलताई आगलावे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर, मा.जिल्हाध्यक्ष अशोक पांगारकर, सतीश जाधव, जिल्हा सरचिटणीस देविदास कुचे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, अरुणाताई जाधव, अश्विनी पवार, शारदा पांढरे, अर्चना सोसे, वैशाली कुटुंबे, छाया घोरभांड, दिपाली बिन्नीवाले सर्व नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस सुनील पवार यांनी केले तर आभार कपिल दहेकर यांनी मानले.

संबंधित पोस्ट

जिल्हा नियोजन समिती बैठक लोकसंख्येची वाढ गृहित धरुन नियोजन करावे- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर दौरा

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा* *4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली* 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 जाहीर त्याचे मुद्दे सादर…

vishwatmaklokswamivarta

आज मध्य महाराष्ट्र, उत्तर अंतर्गत कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता …

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी८ महिला व १ पुरुष क्रिकेटपटूची राज्यस्तरीय संधी; प्रशिक्षक ऋषिकेश काने यांच्या मार्गदर्शनाला यश