vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

रायगड प्रतिनिधी : भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली असून नोंदणी करून घेण्यासाठी पात्र गिग कामगारांनी http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-regitration, या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्म इकोनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगार निर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे. लाखो गिग कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुरक्षित भविष्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनामार्फत गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे ओला, उबेर, रॅपिडो, झोमॅटो, स्विगी, झेपटो, ब्लिंकीट, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, अरबन क्लॅप यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय, राइडर, ड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

00००

संबंधित पोस्ट

सोशल मिडीयापेक्षा वृत्तपत्रातील बातमींवर जास्त विश्‍वास – अ‍ॅड. आश्‍विनी धन्नावत,मराठा महासंघ व पीसीएम जालनाच्यावतीने जाहीरात प्रतिनिधींचा सन्मान प्रिंट मिडिया डेव्हलपमेंट 2025 चा पुरस्काराने नरेश कोरडे सन्मानित

vishwatmaklokswamivarta

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जामधील त्रुटींची पुर्तता करुन अर्ज फेरसादर करावेत

मुद्रांकाचे अतिरीक्त शुल्क आकारल्यास तक्रार करावी

vishwatmaklokswamivarta