vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन

गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन

बुलढाणा, प्रतिनिधी: जळगाव जामोद येथील दि न्यू इरा हायस्कूल येथे ‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांच्या हस्ते गुरू तेग बहादूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळे शरद गोमासे यांनीही माल्यार्पण करून गुरूंना अभिवादन केले.

विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात आलेल्या ३ मिनिटांच्या माहितीपूर्ण चित्रफितीतून गुरू तेग बहादूर यांच्या अद्वितीय त्यागाचा, धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचा व मानवतेसाठी केलेल्या अप्रतिम कार्याचा आढावा घेण्यात आला.

यानंतर गणेश आसेरकर गुरू तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर सखोल माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

संबंधित पोस्ट

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य व गुणवत्तापूर्ण करावा

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

vishwatmaklokswamivarta

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर पुरस्कारप्राप्त कलाकरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

पुणे सार्वजनिक सभे’कडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ प्रदान !*