vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

बदनापूर,(प्रतिनिधी)-तालुक्यातील तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रम येथील मनकामनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथे ४८१ रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील १०४ जणांना मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारखा देण्यात आल्या.बदनापूर, भोकरदन, जालना तालुक्यातील श्रध्दास्थान असलेले शिवशक्ती आश्रम व गौशाळेचे महंत बालयोगी खडेश्वरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली

मनकामनेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे विविध सामाजिक व धामिर्ककार्यक्रमाचे नियमित आयोजन करण्यात येते. वृक्षारोपण, बालविवाह,अंधश्रध्दा निर्मूलन या बाबत खडेश्वरी बाबा समाज प्रबोधन करत असतात.महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी भव्यअशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्यावतीने या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४८१ रूग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आलीतर १०४ जणांना मोतीबिंदूचे निदान झाल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारखा देण्यात आल्या. या शस्त्रक्रिया डॉ. पाथ्रीकर हे स्वखर्चाने करूनआणतात. त्यासाठी वाहनव्यवस्थेसह भोजन व्यवस्थाही ते उपलब्ध करून देतात.शिवशक्ती आश्रमचे बालयोगी खडेश्वरी बाबा, देवा महाराज यांच्या उपस्थितीत

शिबिराची सुरुवात करण्यात आली होती. या प्रसंगी मोठया संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

 

फोटो ओळी…..९ ते १०-तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रम येथील मनकामनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ४८१रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील १०४ जणांना मोतीबिंदूचेनिदान झाले असून त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारखा देण्यात आल्या.

००००००००००००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ आणि अकरा वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

महाज्योती’च्या संशोधकाचा‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात*रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली*पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठीअर्ज पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत रिनिव्हेबल एनर्जी मोहिमेतून सोलार प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत 10 मे रोजी