vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बेकायदेशीर प्लॉट विक्रीतून कोट्यवधींची फसवणूक  कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त  कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

बेकायदेशीर प्लॉट विक्रीतून कोट्यवधींची फसवणूक

 कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त

कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा…

जालना (प्रतिनिधी) : जालना तालुक्यातील मौजे इंदेवाडी येथील कथित बेकायदेशीर प्लॉट विक्री प्रकरणात तातडीने कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा २२ जुलै २०२६ पासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राहुल भास्कर साने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

साने यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गट क्रमांक ८२ मध्ये लक्ष्मीनगर, साईनगर, शिवशंकर नगर, संभाजीराजे नगर, शिवाजीराजे नगर तसेच गट क्रमांक ९६ मध्ये गोकुळ नगर या नावाने प्लॉटिंग योजना राबविण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार या जमिनींना बिनशेती (एन.ए.) परवानगी नसतानाही प्लॉट विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या बेकायदेशीर व्यवहारामुळे हजारो सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करत, संबंधित जमीनमालक शेख मुश्ताक शेख आमीर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सर्व बेकायदेशीर प्लॉट विक्री रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात ३ जून व १२ जून २०२६ रोजीही निवेदने देऊनही प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचा आरोप साने यांनी केला आहे. त्यामुळे न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट

नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षणजिल्हयातील 47 वकिलांचा सहभाग

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा

कसनसूर फळ रोपवाटिका बनणार आदर्श केंद्र – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा आढावा दुर्गम भागातही फळबाग हब साकारण्याचा प्रयत्न, जिल्हा प्रशासनाचा पुढाकार..