vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

23 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरातील 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ

23 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरातील 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ

अमरावती, प्रतिनिधी: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025चे आयोजन दि.23 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 37 जिल्ह्यातील 1 हजार 423 जिल्हा मुख्यालयाच्या केंद्रावर करण्यात आले आहे. या परीक्षेच्या आयोजनाच्या कार्यवाही संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

पेपर एकसाठी 2 लाख 3 हजार 334 उमेदवार व पेपर दोनसाठी 2 लाख 72 हजार 335 उमेदवार असे एकूण 4 लाख 75 हजार 669 उमेदवार महाटिईटी परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या परिक्षार्थींची संख्या आहे. पेपर एक साठी 571 परीक्षा केंद्र आणि पेपर दोनसाठी 852 केंद्र अधिग्रहीत असून संपूर्ण वर्गखोल्या व परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सुरक्षा तपासणीसाठी मेटर डिटेक्टरच्या सहाय्याने फ्रिसकिंग केले जाणार आहे. तसेच परिक्षार्थींच्या आवेदनपत्राच्या मूळ डाटाबेसशी साधर्म्य तपासण्यासाठी बायोमेट्रीक व फेस रिक्गनीशन तपासणी करण्यात येणार आहे.

सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्र संचालकाच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याव्दारे लाईव्ह कास्टींगच्या माध्यमातून सर्व परीक्षा दालनांवर जिल्हा व राज्यस्तरावरून अत्यंत काटेकोरपणे सनियंत्रण ठेवले जाणार आहे. कनेक्ट व्ह्यिूव प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रसंचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कक्ष यांचेकडे हॉटलाईनचे फोन उपलब्ध असतील.

सदर सुविधेमार्फत आवश्यकतेनुसार संबंधितांशी संपर्क साधला जाईल व या फोनच्या माध्यमातून दिवसभर नियमितपणे केंद्रसंचालकासाठी विविध सूचना एकाचवेळी निर्गमित करता येतील. दिलेल्या सूचनांचे (Broadcast) संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असणार आहे. जेणेकरून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहून परीक्षा शिस्तबध्द पद्धतीने घेण्यात येईल.

परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थी/उमेदवारांनी परीक्षेसंबंधी युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचना व माहितीचे अवलोकन करावे, असे परिषदेतर्फे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मिळालेल्या वाहनांचे लोकार्पणपोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर  – पालकमंत्री शंभूराज देसाई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियानातंर्गत बैठकअधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्ह्यात 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा सांगली जिल्हा दौरा

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta