दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली.
मुंबई प्रतिनिधी
दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली. या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा-भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे. तब्बल १४ वर्षाच्या पाठपुराव्याला यश आले असून मिरा-भाईंदरवासियांचे स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीयांना मेट्रोने अंधेरीपर्यंत तसेच एअरपोर्ट टी-१ वरून मेट्रो ३ चा वापर करून थेट कुलाब्यापर्यंत देखील जाता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.