vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य प्रतिनिधी-शिवसेना आणि बैलगाडा शर्यत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सांगलीतील तासगाव कवठे महांकाळ येथील बोरगाव कोड्याचे माळ येथे महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने ‘श्रीनाथ बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते

कवठे महांकाळ, #सांगली | येथे भव्य अशा बैलगाडी शर्यतीचे  शिवसेना आणि बैलगाडा शर्यत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून येथे मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी पहिल्यांदा पहात असल्याचे याप्रसंगी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ,या स्पर्धेची आधीच्या पक्षातील लोकांनी किंमत केली नाही, पण काश्मीरमध्ये सिंदूर महारक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी  मंत्री उदय सामंत यांच्या साथीने एवढी मोठी भव्य स्पर्धा आयोजित केली होती

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. असे यावेळी उपमुख्यमंत्री  म्हणाले त्यामुळेच माझी ओळख काऊज मॅन अशीही झाली. या शर्यतीच्या आयोजनातून गोवंशाचे जतन करण्याचे काम होत असल्याचे नमूद केले.

या बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी आणली, त्यानंतर हा आपला सांस्कृतिक ठेवा असल्याने ही शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळेच ही स्पर्धा पुन्हा सुरू होऊ शकली. पै.चंद्रहार पाटलांच्या पुढाकाराने पैलवानांच्या तालमींना आपल्याला ताकद द्यायची आहे, तसेच त्यांच्या साथीने बैलगाड्याबांबतचे अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत, असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या,सांगलीतील तासगाव कवठे महांकाळ येथील बोरगाव कोड्याचे माळ येथे आयोजित ‘श्रीनाथ बैलगाडा शर्यतीला’ उपस्थित राहून लाखो शेतकरी बांधवांशी संवाद साधला.

बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या अनोख्या खेळाचा नाद जोपासणारे शेतकरी या शर्यतींसाठी लाखोंच्या संख्येने जमले होते. ट्रकवरून फेरफटका मारत या सर्वांना अभिवादन केले. तसेच या स्पर्धेची त्यांना किती उत्सुकता असते हेदेखील प्रत्यक्ष अनुभवले

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, डबल महाराष्ट्र केसरी आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक चंद्रहार पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि बैलगाडा मालक व या स्पर्धेचे लाखो चाहते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न! 🏃‍♀️🏅

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन

शिवराज्याभिषेक सोहळा-2025 करिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी