जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपणासाठी नवी मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देणार वृक्षरोपे
नवी मुंबई प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध वृक्षसंवर्धन कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. त्या अनुषंगाने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांनी जाहीर केलेल्या ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचे निर्मूलन’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.
या महत्वाच्या दिनाचे औचित्य साधून आपल्या शाश्वत भविष्यासाठी नवी मुंबई मधील शासकीय / निमशासकीय / अशासकीय कर्मचारी / सुजाण नागरिक / व्यापारी / युवक – युवती / विद्यार्थी / सामाजिक सेवाभावी संस्था / महिला बचत गट / ज्येष्ठ नागरिक आदी व्यक्ती / संस्था यांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
या अंतर्गत वृक्षरोपणाकरिता रोपांची आवश्यकता असल्यास ती वृक्षरोपे नवी मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालयात उद्यान सहाय्यक समन्वयाची भूमिका बजावणार असून नागरिकांनी वृक्षारोपणाकरिता वृक्षरोपे उपलब्ध होण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.श्री.गणेश देशमुख – बेलापूर भाग 1/ वाशी – 8369788394श्री.विलास पडवळ – बेलापूर भाग 2 / नेरूळ -8369788394
श्री.राज बांगर – ऐरोली – 9272479444 श्री.अनिल गायकवाड – दिघा – 8108246729 तरी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लावून व जगवून सर्वांनी एकत्रितपणे आपले नवी मुंबई शहर हरित करण्यासाठी योगदान देऊया असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.