vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई, प्रतिनिधी:

राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर २५ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ३५ ते ४५ किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी तो ५५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

समुद्रामध्ये असलेल्या सर्व मासेमारी नौकांनी तात्काळ सुरक्षितपणे बंदरात परत यावे तसेच स्थानिक बंदर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश!

vishwatmaklokswamivarta

करवंड येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी गुणवंताबाई विवाह सोहळा उत्साहात संपन्न;किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता अर्ज करावेत…

औरंगाबाद विभागातील पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करावी

3 ते 9 ऑक्टोबर कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका करणार अभिजात मराठी भाषेचा जागर…