vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

बुलढाणा, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिण्याच्या सोमवार व शुक्रवारला सकाळी 10 ते 2 या वेळेत “प्रवासी राजा दिन” व दुपारी 3 ते 5 या वेळेत “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे. प्रवाशी आणि महामंडळाचे कामगार यांनी याचा लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.

> बुलडाणा विभागातील आगारामध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. चिखली आगार येथे शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी, खामगांव आगार येथे सोमवार दि. 17 फेब्रुवारी, मेहकर आगार येथे शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी, मलकापूर आगार येथे सोमवार दि. 24 फेब्रुवारी, जळगांव जामोद येथे शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी व शेगांव आगार येथे सोमवार दि. 3 मार्च रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 0000000

संबंधित पोस्ट

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजार ४५९ पोलिसांना मिळणार हक्काचे घर राज्यातील पोलीस अंमलदारांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार दोन वर्षांपासून प्रलंबित डीजी लोनला १७६८ कोटींची मंजुरी,आ. श्री. मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अणवाणी, दुचाकीवरुन गाठला शेतकऱ्यांचा बांध**परिस्थितीचा आढावा घेऊन दिला धीर*

vishwatmaklokswamivarta

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास 148 कोटी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता…

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे* जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती * जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन सतर्क* *मॉक ड्रिल, सागरी व मर्मस्थळ सुरक्षा वाढवली*

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी इच्छूक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा