vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी

जालना, (प्रतिनिधी)-जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि ‘आत्मा’ च्यावतीने नुकतेच पाच दिवसीय जिल्हा कृषी प्रदर्शन आजाद मैदान येथे पार पडले.या शेतकरी महोत्सवामध्ये जालना तालुक्यातील पाचनवडगाव येथील बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या वतीने एका दालनामध्ये विषमुक्त धान्य व भाजीपाला ठेवण्यात आला होता. याला जालन्यातील नागरिकांसह शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला.या आगळ्या वेगळ्या सेंद्रीय अन्न धान्य उत्पादन करणार्‍या बिजांकुर कंपनीने सेंद्रीय गहु, ज्वारी, जवस हे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या दालनास जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे, आत्माचे संचालक अमोल आगधने, जे.पी.शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी यांनी भेट देऊन कंपनीच्या उत्पादनांची पाहणी करून कौतूक केले.या प्रदर्शनात बिजांकुर कंपनीचे संचालक रामकिसन वायाळ, नामदेव नागवे,

संतोष काकडे, विश्वंभर कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

दर्जा, ट्रेसेबिलिटी आण मूल्यवर्धनावर भर दिल्यास निर्यात संधी अधिक वाढतील – सचिव एन. भवानीश्री शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा प्रभावी व्यासपीठ- जिल्हाधिकारी,हळद क्षेत्रातील शेतकरी-निर्यातदार संबंध मजबूत करण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोही- 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस- आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त

vishwatmaklokswamivarta

जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला मिळणार चालना जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’चा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

बनावट कागदपत्रांद्वारे जालन्यातील सर्व्हे ५५४ मधील 5 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न उघडकीस,न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन भूमी अभिलेख अधीक्षक व दुय्यम निबंधकासह ५ जणांवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प