vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्यास्थानिक बातम्या

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई: प्रतिनिधी- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची सेवाकाळात एक वेळची बाब म्हणून बदली करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच पारित करण्यात आला आहे. दि. 23 जून 2025 ते दि. 25 जून 2025 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमणूक झालेले समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. गेली काही वर्ष समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांकडून विनंती बदली करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. तृतीय स्तरीय आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने एक वेळची बाब म्हणून माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण श्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक निर्णय घेत सेवाकालातील एक वेळची बाब म्हणून राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बदली धोरणास मान्यता दिली आहे.

सध्या वेगवेगळ्यात जिल्ह्यात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदलीसाठी विनंती करता येणार आहे. सदर आंतरजिल्हा बदली संचालक-1 आरोग्य सेवा, मुंबई यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदली करीता इच्छुक समुदाय आरोग्य अधिकारी यांचेकडून दि. 12 जून 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येणार असून प्राप्त अर्जांची छाननी दि. 13 जून 2025 ते 19 जून 2025 पर्यंत होणार आहे. बदली पात्र समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची यादी दि. 20जून 2025 रोजी आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. 23 जून 2025 ते 25 जून 2025 या कालावधीत विनंती बदली संदर्भाने समुपदेशन आयोजित करण्यात येणार आहे. समुपदेशनानंतर बदली करण्यात आलेल्या समुदाय अधिकाऱ्यांना दि. 07 जूलै 2025 पर्यंत रुजु होणेसाठी मुदत देण्यात येणार आहे.

 जिल्हा अंतर्गत बदली करणेकरीता शासनामार्फत सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार बदली प्रक्रिये संदर्भाने समिती स्थापन करणेबाबतच्या सुचना जिल्ह्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार असून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिक लोकाभिमुख सेवा मिळेल.

0000

संबंधित पोस्ट

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमअन्वये कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

जागतिक आरोग्य संघटनेकडून इबोला उद्रेक ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित; आफ्रिका रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून ‘खंडांतर्गत सुरक्षिततेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माण तालुक्यातील विविध शाळांना दिल्या* *भेटी* 

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

vishwatmaklokswamivarta

आज मध्य महाराष्ट्र, उत्तर अंतर्गत कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता …

vishwatmaklokswamivarta

पणजी येथे 9 डिसेंबरला डाक अदालत

vishwatmaklokswamivarta