vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पावसाळीअधिवेशन२०२५ #विधानसभालक्षवेधी

पावसाळीअधिवेशन२०२५ #विधानसभालक्षवेधी

राज्य प्रतिनिधी-

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात गोदावरी नदीवर बाभळी उच्च पातळी बंधारा आहे. बंधाऱ्याचा प्रकल्पीय पाणीसाठा १.९६ टीएमसी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २८ फेब्रुवारी २०१३ च्या निर्णयानुसार बाभळी बंधाऱ्याची दारे दरवर्षी १ जुलै ते २८ ऑक्टोबर या कालावधीत उघडी ठेवण्यात येतात. यामुळे तेलंगणातील श्रीराम सागर प्रकल्पात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणीसाठा निर्माण होऊन पाणी समुद्रात वाहून जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून बाभळी बंधाऱ्याच्या जलसंपत्ती व्यवस्थापनाबाबत तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

#विधानसभालक्षवेधी

दिव्यांगांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विनाअनुदान तत्त्वावरील उपक्रमांना काही अटी व शर्तींच्या अधीन राहून १०० टक्के अनुदान तत्वावर मान्यता देण्यास १२ मार्च २०१५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली. यामध्ये पात्र ठरलेल्या १२१ उपक्रमांमध्ये एकूण २ हजार ४६४ पदांना ५० टक्के वेतन अनुदान तत्त्वावर मान्यता देण्यात आली. दिव्यांगांसाठी चालविण्यात येणाऱ्या स्वयंसेवी संस्था उपक्रमांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे, असे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

#विधानसभालक्षवेधी

वन जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत धार्मिक स्थळ निर्माण केल्या असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी वन जमिनींवरील अतिक्रमणाबाबत पुढील दोन महिन्यात माहिती संकलित करण्यात येईल. अतिक्रमित जमिनींवरील अनधिकृत धार्मिक स्थळ निर्मितीच्या बाबी तपासून अशांवर फौजदारी खटला दाखल करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन मंत्री गणेश नाईक यांनी दिला.

#पावसाळीअधिवेशन२०२५

संबंधित पोस्ट

लोकं नाही तर गडचिरोलीचा विकास धावत आहे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल**गडचिरोली महामॅरेथॉनमध्ये १४ हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडूनशहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनासाठी डायनींग टेबल दिले भेट *

नवी मुंबई महानगरपालिका- ऐरोली  विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

जगत ज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज आणि श्री शरण हरळय्या संयुक्त जयंती सोहळा धारावी विभागात संपन्न

vishwatmaklokswamivarta

भांडुप मध्ये आरके विधीमहाविद्यालयाचे उद्या उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ; खासदार उज्ज्वल निकम उपस्थित राहणार