vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका- ऐरोली  विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका- ऐरोली  विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

           नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) श्री. भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

  नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत विवेक कोटकर व ईतर, विनिता अपार्टमेंटच्या मागे, ऐरोली गाव, सेक्टर-20, ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम नमुंमपाच्या अंतर्गत अंशत: निष्कासित करण्यात आले आहे.

    या धडक मोहिमेसाठी 3 ब्रेकर, 2 हॅमर, 1 गॅस कटर, 10 मजूर व 01 मुकादम यांचा वापर करण्यात आलेला असून, मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अतिक्रमण विषयक अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. सदर कारवाई अंतर्गत सदर बांधकाम धारकाकडून रूपये 50,000/- प्रमाणे दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले आहे.

     यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

शाळेच्या पहिल्या दिवशी होणार विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; विविध उपक्रमांचे आयोजन

जीएसटी’ मध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ वा वस्तू व सेवा कर दिवस समारंभ

विधान परिषद प्रश्नोत्तर :नर्मदा नदीचे ११ टीएमसी पाणी वापरासाठीचीप्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

पंचायत समिती कल्याण येथे कीटकनाशके हाताळणी, साठवणूक व फवारणीसाठी शेतकऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेची पाणीपट्टी वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 112 कोटींची पाणीपट्टीची वसुली

पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले’जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’चा समारोप