vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालघर जिल्ह्यात वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी १६१२ कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे

पालघर जिल्ह्यात वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी १६१२ कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे..

मुंबई, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात वीजपुरवठा खंडित होऊ नये, याकरिता वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत १६१२ कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यामधून जिल्ह्यात ऊर्जा सक्षमीकरणाचे कामे करण्यात येतील, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर- साकोरे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

पालघर जिल्ह्यातील वीज पुरवठाबाबत सदस्य विलास तरे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य राजेंद्र गावित यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.या संदर्भात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे म्हणाल्या, वसई, पालघर तालुक्यातील आदिवासी गावांना वीज पुरवठा नियमित करण्यासाठी ढेकाळे ३३ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. यासाठी पाटबंधारे विभागाची जागा अत्यल्प भाडेदरात मिळाली आहे. या जागेवर उपकेंद्र पुढील वर्षभरात उभारण्यात येईल. पालघर जिल्ह्यात १३१ केव्ही क्षमतेचा जव्हार उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. सूर्यनगर येथील १३२ केव्ही क्षमता असलेल्या उपकेंद्राचे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे. डहाणू ते दापचरी वीज वाहिनीचे काम पूर्ण करण्यात येईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सहा उपकरणांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न 

नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई -प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेंतर्गत एप्रिलच्या पंधरवड्यात 85 हजार दंडात्मक वसूली व 283.700 किलो प्लास्टिक जप्त…

ऑपरेशन सिंदूरचा समग्र राजकीय-लष्करी उद्देश पाकिस्तानला छुपे युद्ध लढल्याबद्दल शिक्षा करणे हा होता; पाक-पुरस्कृत दहशतवाद ही एक सुनियोजित रणनीती आहे : लोकसभेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांनी खेळला पर्यावरणपूरक टाळ्यांचा गरबा

vishwatmaklokswamivarta

आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर विधानसभा प्रश्नोत्तर

कल्याण तालुक्यातील कांबागाव येथील जमीन हस्तांतरण नियमानुसार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे