vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी : भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनस्तरावर सकारात्मक विचार केला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संघटनासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जमीन मोजणीसाठी आवश्यक अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना करत, महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, भूमी अभिलेख विभागाकडील भू-करमापक पदाच्या वेतनश्रेणीबाबत केलेल्या मागणीबाबत विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळस्तरावर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही केली जाईल. तलाठी संवर्गात ज्या प्रमाणे प्रवास भत्ता दिला जातो त्या प्रमाणे प्रवास भत्ता देणेबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

या बैठकीत भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, आकृतीबंध, अनुकंपा भरती, सरळसेवा भरती, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि सेवाज्येष्ठता यादी याबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भात विभागाने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

०००००

संबंधित पोस्ट

📢 कृपया लक्ष द्या… वाहनचालक, प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन..

सातारा जिल्ह्यातील साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी..

vishwatmaklokswamivarta

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 241 मुली बेपत्ता…

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर 

सायन कोळीवाडा जी. टी. बी. रेल्वे स्टेशन लटकत्या जाहिरात फलकावर कारवाई मागणी -रेल्वे प्रवासी

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश· कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी· राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta