vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव टेकसागर- २०२६ एआय हॅकाथॉन स्पर्धा उत्साहात-पिल्ले कॉलेज प्रथम, तर तासगावकर महाविद्यालयातील वेदांत कायंदेकर यांच्या ग्रुपला द्वितीय क्रमांक

राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव टेकसागर- २०२६ एआय हॅकाथॉन स्पर्धा उत्साहात-पिल्ले कॉलेज प्रथम, तर तासगावकर महाविद्यालयातील वेदांत कायंदेकर यांच्या ग्रुपला द्वितीय क्रमांक

राज्य प्रतिनिधी-मुंबई-यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भिवपुरी-कर्जत (महाराष्ट्र) येथे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल टेकफेस्ट टेकसागर- २०२६ अंतर्गत एआय हॅकाथॉनची २४ तासांची राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. हा टेकफेस्ट २३ व २४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवात विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धांमध्ये हॅकाथॉन, प्रोजेक्ट प्रदर्शन, तांत्रिक सादरीकरण तसेच तांत्रिक चर्चासत्रांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना आपली कल्पकता, संशोधन क्षमता आणि तांत्रिक कौशल्य सादर करण्यासाठी या कार्यक्रमाने प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल नवकल्पनांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण अठरा ग्रुपांनी सहभाग घेतला होता. विविध महाविद्यालयांमधील चोपन्न विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रत्येक ग्रुपमध्ये तीन विद्यार्थी होते. स्पर्धेत पिल्ले कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला, तर यादवराव तासगावकर महाविद्यालयातील कुमार वेदांत दिपक कायंदेकर यांच्या ग्रुपला द्वितीय क्रमांक मिळाला.वेदांत कायंदेकर, ऋषिकेश काळोखे आणि पार्थ देशपांडे या विद्यार्थ्यांनी ‘फायनान्स फ्रॉड डिटेक्शन’ हा प्रकल्प परीक्षकांसमोर सादर केला. या स्पर्धेच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या होत्या.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदकुमार तासगावकर, चांधई कॅम्पसचे सीईओ पराग ओला, अतुल म्हात्रे, प्राचार्य डॉ. निलेश पवार, उपप्राचार्य डॉ. हरीश बारापात्रे तसेच प्रो. समाधान पाटील उपस्थित होते. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि रोख बारा हजार रुपये (१२,०००/-) देऊन गौरव केला.

हे तिन्ही विद्यार्थी यादवराव तासगावकर महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे वेदांत कायंदेकर हा योगा शिक्षक असून तो किक बॉक्सिंग आणि कराटेचे प्रशिक्षणही देतो. कराटेमध्ये तो ब्लॅक बेल्ट (पहिला डन) धारक आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘टेकसागर-२०२६ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, संशोधन आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास होण्यास मोठी चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले

0000

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दौड ने साजरी..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार

लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकालात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड…

प्रा. लक्ष्मण हाके यांनी जीआर फाडला खामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप

मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे

vishwatmaklokswamivarta