vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वाद्यरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य विभागाचा वाद्यजागर; ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन ‘स्वराज्य की शपथ’ टपाल तिकीटाचे व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन

वाद्यरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य विभागाचा वाद्यजागर; ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन’स्वराज्य की शपथ’ टपाल तिकीटाचे व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी -सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत वाद्यरंग या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित स्वराज्य की शपथ या टपाल तिकीटाचे प्रकाशन व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय विविध वाद्यांच्या जुगलबंदीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

‘वाद्यरंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कार्यक्रमातून २०० पेक्षा जास्त कलाकारांना आपली कला दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

वाद्यरंग हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम १४ ऑक्टोबर, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कलांगण, रविंद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण..

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण होणार- मंत्री आदिती तटकरे

लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकालात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड…

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

vishwatmaklokswamivarta